Showing posts with label पावसाचे मॅनिफेस्टेशन. Show all posts
Showing posts with label पावसाचे मॅनिफेस्टेशन. Show all posts

Thursday, 22 October 2026

पावसाचे मॅनिफेस्टेशन

दोस्तों आज मी एक फार सुंदर विषय घेऊन आपल्या समोर येत आहे. तो विषय आहे "पावसाचे मॅनिफॅस्टेशन " कसा वाटला विषय ? 
  तर चला आपण या विषयावर थोडं सखोल जाउ. मित्रांनो जेव्हा आपण युट्यूब उघडतो तेव्हा आपणास करोडो व्हिडिओ मॅनिफॅस्टेशन वर सापडतील. 
  त्यात करोडो रेमिडिज. ये करो इतना सारा पैसा आयेगा/ दाये हाथ पर ये लगाओ आपका ये ग्रह अच्छा हो जागा/
  सोमवार को ये रमिडि करो ये ठीक होगा/
 मंगलवार को ये करो सब कुछ मिल जागा / 
जिंका बुध अच्छा  है उनको कुछ करने की जरुरत नहीं होती/ 
घर की नकारात्मक उर्जा निकालने के लिये ये करो/ ईससे पोछा लगाओ ये १००% नहीं १०००% , ५०००% ये रमिडी काम करेगी ही करेगि/ मी यांच्या व्हिडिओ ला किंवा रेमिडीजला बिल्कुल दोष देत नाही. पण...
  आता या व्हिडिओला व्यूहज किती? लाखोवर व्यूहज, आता प्रत्येकी लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला म्हटल्यावर कुठेही समस्या यायला नको. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात, गल्लीत, दिल्लीत, आणि आकाशात कारण इतक्या लोकांची ग्रहस्थिती एकदम छान. मग सांगा दुष्काळ कसा? 
   बरं एवढ्या सगळ्या प्रश्नांवर रेमिडी काढता पाउस पाडण्यासाठी तुमच्या कडे एकही रेमिडी नाही. आरशासमोर उभे राहा आणि हे वाक्य बोला. आरे जरा अशी पण रेमिडी द्या ना बाई ' नदी काठी उभे राहा , आणि हे वाक्य बोला. " नदी तुडुंब भरली आहे. पाण्याचा प्रवाह सतत चालू आहे. थंड हवेचे शिंतोडे येत आहेत". अहाहा! काय छान दृश्य! अहो सहज घराच्या छतावर गेले आणि काळेकुट्ट ढग भरून आले आणि काय पाउस आला म्हणता रस्त्यांनी चालण मुश्किल. जिकडे तिकडे पाणीच पाणी. रस्त्यावर होडया बापरे उभ्या आयुष्यात कधी नव्हत्या. 
  बाई तुम्ही पैशासाठी किती रेमिडीज दिल्या तर कमीच आहेत. कारण हे लोक काय करतील माहिती आहे का! ईतका पैसा साठवतील की बस‌ . आता हा पैसा कुठे ठेवायचा "बरं झालं दुष्काळ पडला तर  आता आपण हा पैसा संडासच्या टँकमध्ये ठेवु या" आता रिकामा आहे. बघू पाउस आल्यावर काय होतं ते. अशा प्रवृत्तीचे लोक आहेत आपल्या कडे. यांना पावसाचं, सध्याच्या परिस्थीती चे देणं ना घेणं
  मी म्हणते भारतातल्या सगळ्या भविष्य वाल्यांनी एक दिवस व वेळ ठरवून दुष्काळावर रेमिडी का नाही काढत? 
  आता बघा ना! घरासाठी मॅनिफेस्टेशन केलं, घर मिळालं, गाडी, बंगला, प्रवास, लग्न, हौसमौज हृया सगळ्यांसाठी मॅनिफेस्टेशन केलं की ते सगळं मिळतं. 
  मग पाऊसपाणी, गुरेढोरे, हिरवेगार शेत, डोंगर, धान्याचा ढीग, हिरवगार, शेत, फुलांनी फळांनी बहरलेली शेती, आनंदात काम करत असलेले शेतकरी. यासाठी  मॅनिफेस्टेशन कोणी केलं का हो ? 
  पाऊसपाणी, आणि हे सगळं काय करायचंय आपल्याला. उलट बरं झालं रे बाबा पाउस आला की सगळी घाण. सगळीकडे चीक चीक. कुठे जाता येत नाही काही नाही. ओ ते आम्हाला काही सांगू नका. आमचं काही अडले नाही त्यामुळे. 
 ज्याच्या जीवावर तुम्ही आयुष्यातील सर्व गोष्टींचे मॅनिफेस्टेशन करता त्या विषयावर कधी मॅनिफेस्टेशन करावे हा विचार तुम्हाला आला नाही का? 
  की वेदांमध्ये, किंवा आपल्या भारतीय अनेक पौराणिक कथेमध्ये आपल्याला हा विषय कुठे भेटलाच नाही? की आपणास या विषयावर काही देणेघेणेच नाही. 
  असं जर असेल तर एक दिवस मानवजातीला खूप अवघड आहे.ज्योतिष आणि मनशक्ती यांचा संबंध कसा जुळवाल?
307c7eebc69c1089b794001342c8abd452f037ca4c5de2e011