आज पेपरला उदगीर येथील विसर्जनाची बातमी वाचली.त्यात निर्माल्य विहिरीत, तळ्यात,नदीत टाकलेले फोटो दिसले. अगोदरच आपण पाण्यासाठी खूप बेचैन असोत. त्यात यावर्षी कसेतरी निसर्गाने पाण्याच्या रुपात ढळते माप सोडलेले आहे. मग आपण त्या पाण्याची स्वच्छता आणि जपणूक करायला नको का?
पाण्यात निर्माल्य टाकल्यामुळे त्यामध्ये अळ्या ,किडे आणि पाणी खराब होउन जाते. ते शेतीला सुद्धा वापरता येत नाही. आणि त्या निर्माल्याचा काही उपयोग पण होत नाही.
निर्माल्य हा काही साधा प्रकार नसतो. यात देवाच्या नावाचे vibrations असतात. ते कोठेही टाकू नये. त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास धरती माय आणि गणपती बाप्पा तथास्तु म्हणून आशिर्वाद देतात.
मग कसा करणार याचा वापर? एक मोठा खड्डा खणून त्यामध्ये टाकावे आणि ते शेतात थोड्या दिवसांनी खत म्हणून वापरावे. सार्वजनिक गणेश मंडळांनी पण हाच मार्ग अवलंबावा. मग आपोआपच सगळ्यांना त्याचा फायदा होईल.
जय गजानन माऊली 🙏
अशा उपयोगी पोष्ट वाचण्यासाठी कृपया भक्ती व्हिडिओ मध्ये सामील व्हा.
जय गजानन माऊली 🙏
Get spiritual ebook here
No comments:
Post a Comment
write comments down side.